Uncategorizedताज्या बातम्या

इम्रानखान पठाण आणि अफिराह पठाण यांचा शुभविवाह थाटात संपन्न झाला….

मदनसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, शिवतेजसिंह मोहिते पाटील, रावसाहेब मगर, नितीनराजे निंबाळकर, के. के. पाटील, राजेंद्र रणवरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती…

अकलूज (बारामती झटका)

ज. हारूणखान हा. महीमुदखान पठाण, पठाणवस्ती, ता. माळशिरस, यांचे चिरंजीव इमरान खान आणि ज. मोहनखान इस्माईलखान पठाण, पठाणवस्ती, ता. माळशिरस यांची सुकन्या अफिराह (फरहद) यांचा शुभविवाह रविवार दि. १४/५/२०२३ रोजी सकाळी १० वा‌‌ ४५ मि. या शुभ मुहूर्तावर स्मृतीभवन अकलूज, ता. माळशिरस येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सदरच्या शुभविवाह प्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिवतेजिंह मोहिते पाटील उर्फ शिवबाबा, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मल्लसम्राट रावसाहेब मगर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे प्रांतिक निमंत्रित सदस्य के. के. पाटील, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे साहेब, गोंदीचे सरपंच बापू वाघमोडे, शेतकरी पतसंस्था चांदापुरी चेअरमन व माजी सरपंच भजनदास चोरमले, ‌डॉ. अलीम पठाण, नईमखान पठाण सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण, युवा नेते विजय पाटील, निमगावचे माजी उपसरपंच श्रीमंतनाना मगर, शेतकरी संघटनेचे अशोकतात्या मगर, चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, साजिदभाई सय्यद, युवा नेते जुल्कर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पठाण रावसाहेब, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यासह पठाणवस्ती पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर मंगल प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद दिलेले आहेत. ज. नईमखान हा. महमुदखान पठाण प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य आणि ज. एजाज फैजखान पठाण, सरपंच ग्रामपंचायत पठाणवस्ती यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. पठाण आणि पठाण यांच्या शुभविवाह प्रसंगी मनपसंत शाकाहारी व मांसाहारी भोजनाची व्यवस्था केलेली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button