उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ पाटील यांच्या दुःखात पत्राद्वारे सहभागी
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय बकुळाबाई देवबा सुळ पाटील यांच्या दुःखद निधनाने सुळ पाटील यांच्या परिवारांचे सांत्वनपर पत्र दिले आहे.
सदरच्या पत्रामध्ये आपल्या मातोश्री बकुळाबाई देवबा सूळ पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या जडणघडणीत त्यांच्या संस्काराचा खूप मोठा वाटा आहे. सामाजिक बांधिलकीची शिकवण त्यांनीच तुम्हा भावांमध्ये रुजवली. त्यांच्या निधनाने आपला एक आधारवड हरवल्याची जाणीव आहे. आपण आपल्या आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता घरासमोरील मोकळ्या जागेत करून त्यावर लावलेले झाड आपल्या सामाजिक दायित्वाचे द्योतक आहे. आपल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर आपल्याला देवो, हीच प्रार्थना. अशा आशयाचे पत्र पाठवलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.