Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने विकासरत्न विजयदादांच्या विकास वाटेवरून दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल….

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धमाका सुरू…

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मतदार संघात जनता दरबाराला उदंड प्रतिसाद

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धुमधडाका सुरू आहे. माळशिरस तालुक्याला विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी विकासाची वाट निर्माण केलेली आहे. विजयदादांच्या विकास वाटेवरून दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू असून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदार संघात सुरू केलेल्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विजयाचे चाणक्य आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी आमदार राम सातपुते यांना मिळालेली आहे. पहिल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकार असताना मतदार संघामध्ये विकासकामे करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्यातून माळशिरस तालुक्यातील जनतेचे अडीअडचणीचे प्रश्न सोडविणे व विकासकामे करण्याचे काम सुरू होते.

मात्र, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विकासकामांचा धुमधडाका सुरू केलेला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी माळशिरस तालुक्यातील विकासकामांना घेतलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य स्वच्छता, मंदिरांना सभा मंडप व विविध समाजांना समाज मंदिर अशी कामे करण्याचे काम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात एकही गाव किंवा वाडी वस्ती विकासापासून वंचित ठेवलेली नाही.

माळशिरस तालुक्यात लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी जनतेला अडीअडचणी व प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे, सर्वांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार सुरू करून जनतेचे प्रश्न तात्काळ सोडविले जात आहेत. अनेक लोकांचे व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये आपली कैफियत मांडली जाते. तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली असल्याने आरोग्यदूत या नावाने आमदार राम सातपुते यांची नव्याने ओळख झाली आहे.

सर्वसामान्य व गोरगरिबांची अनेक अवयवाची मोफत ऑपरेशन व शस्त्रक्रिया करून जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे. कितीतरी वर्षापासून व्याधीने त्रस्त असलेले पण, पैशांअभावी रखडलेली ऑपरेशन करून अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर आ. राम सातपुते यांच्या रूपाने आनंद तरळत आहे.

दिवसेंदिवस जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर, विकासकामांच्या धुमधडाक्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. खऱ्या अर्थाने आमदाराच्या नावात राम आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात रामराज्य असल्यासारखे गुण्यागोविंदाने नागरिक नांदत आहेत. आपली कैफियत हक्काने मांडून व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्न सोडवून घेत आहेत. संबंधित कामासाठी अधिकाऱ्यांना लगेचच फोन लावून काम मार्गी लावत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनता लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या कामगिरीवर व जनता दरबारावर समाधानी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button