Uncategorized

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माळशिरस यांनी त्रिस्तरीय सदस्य समितीची केली चेष्टा ?

भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस अधिकारी यांचं डोकं ठिकाणावर आहे का ? 

त्याच गटातील त्रयस्त व्यक्तीचे बोअर वाचवण्यासाठी म्हातारीच पन्नास वर्षापासून असलेलं घर मोजणीत शेजाऱ्याला देऊन टाकलं ?

माळशिरस (बारामती झटका)

उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माळशिरस येथे कार्यरत असणाऱ्या भूमी अधीक्षक यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याकरिता त्रिस्तरीय सदस्य समितीची निवड तालुक्यातील जनतेचे  अनेक प्रलंबित प्रश्न असल्याने सर्व लोकांच्या तक्रारीनुसार  माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या मतानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयाचे सुदाम जाधव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांनी पत्र काढलेले होते.

सदरच्या प्रकरणी  दि १९/४/२०२३ रोजी सकाळी  ११.३० वा. उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस या कार्यालयात तालुक्यातील विविध भागातून तक्रारदार आले होते.

त्रिस्तरीय समिती यांनी विभागवार चौकशी करून चौकशीअंती सर्वांवर ताशेरे ओढले. तरीसुद्धा या कार्यालयाला अध्यापही जाग आलेली नाही. तरी या कार्यालयाला कधी जाग येणार ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांतून विचारला जातोय. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी यांचं डोकं ठिकाणावर आहे का ? हा प्रश्न उपस्थित होतो.

देवई सिताराम लेंगरे (वय ७०) मी त्रिस्तरीय समितीला अर्ज देऊनही मला योग्य न्याय मिळाला नाही. तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडेही पाठपुरावा केलेला होता. माझं मालक नाहीत, त्याला ३० वर्ष झालेत. माझं पन्नास वर्षापासून माझ्या रानात असलेलं घर मोजणीदाराचं डोकं ठिकाणावर नसल्याने दुसऱ्याच्या हिश्यात घातलं. त्यामुळे मला घर नाही. उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस येथे अनेक वर्षापासून हेलपाटे मारूनसुद्धा योग्य न्याय मिळत नसल्याने, मी शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा म्हणून भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस येथे जाऊन पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. This piece provided a lot of food for thought. It was well-written and very informative. Let’s chat more about it. Feel free to visit my profile for more related content.

Leave a Reply

Back to top button