कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्टला तत्वता मान्यता – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर..

मुंबई (बारामती झटका)

आज दि. १२/७/२०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले, अधिक्षक अभियंता कुमार पाटील, चिफ इंजिनिअर गुनाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत, यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. पावसाळ्यामध्ये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील काही भागात, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतुन जे पाणी वाहून जाते, त्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण खटाव, फलटण व पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल.

यासंदर्भामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीची बैठक घेऊन आज फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली आहे. व हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद आज करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट आज फडणवीस साहेबांनी दिली. भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. हरित क्रांतीबरोबर आर्थिक क्रांती होईल. तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button