क्रीडा प्रशिक्षक दिपाली सातपुते या राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील क्रीडा प्रशिक्षक दिपाली मधुकर सातपुते यांना अविष्कार फाउंडेशनच्यावतीने लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ या पुरस्काराने रविवार दि. २५/०६/२०२३ रोजी डॉ. व्ही.टी. पाटील सभागृह, कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. त्यांना क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहे. पण, क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांना राज्यस्तरावर मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिपाली सातपुते या १५ वर्षांपासून शंकरराव मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज, अकलूज येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. तीच आवड त्यांनी जोपासली आणि आज त्या क्रीडा क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचल्या आहेत. त्यांनी ॲथलेटिक्स (थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक), वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, अश्वमेध, रस्सीखेच अशा स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळविली आहेत. त्यांना आत्तापर्यंत ९० गोल्ड मेडल, ३५ सिल्वर मेडल, आणि १३ ब्राँझ मेडल्स मिळाली आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेतच केरळ, पंजाब, बेंगलोर अशा अनेक राज्यात जावून क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, सचिव धर्मराज दगडे, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य अल्बर्ट सर व बिनो मॅडम यांनी विशेष कौतुक केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
