खंडाळी-दत्तनगर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंचपदी सुनिता सुरवसे
खंडाळी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील खंडाळी-दत्तनगर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंचपदी समविचारी ग्रामविकास आघाडीच्या सुनिता सुरवसे या त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रीनाथ पॅनलच्या सारिका कटके यांचा १५२ मतांनी पराभव करून विजयी झाल्या. ग्रामविकास आघाडीचे १७ पैकी ९ उमेदवार विजयी झाले तर श्रीनाथ पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्र. १ मध्ये बाबुराव पताळे यांनी श्रीनाथ खटके यांचा ६१ मतांनी परभव केला असला तरी प्रभाग क्र. ५ मध्ये बाबुराव पताळे यांच्या पत्नी सुनिता पताळे यांचा सुरेखा पताळे यांनी १५७ मतांनी पराभव केला. अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये ८०% मतदान झाले होते.
भोसलेवस्ती प्रभाग क्र. ६ मध्ये नितीन थोरात यांनी मदन शिंदे यांचा ४४६ मतांची विक्रमी आघाडी घेऊन पराभव केला. विजयी उमेदवारांचे हरिदास भोसले, सुभाष गांधी, दत्तात्रय रिसवडकर, रावसाहेब भोसले, अशोक तात्या पताळे, अमोल मेथा, अविनाश पताळे, महादेव साबळे यांनी अभिनंदन केले.
शिवरत्न बंगला यशवंतनगर येथे सुनिता सुरवसे व विजयी उमेदवारांचा धैर्यशील मोहिते पाटील यांनी सत्कार केला. ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी घोषणा देत फटाक्यांची आतीषबाजी करत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. खंडाळीसारख्या मोठ्या गावामध्ये सुनिता सुरवसे जनतेतून सरपंच झाल्याने महिलांनी पेढे, बर्फी वाटून आनंदोत्सव साजरा केला. दत्तनगर-खंडाळी समविचारी ग्रामविकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार माजी उपसरपंच सुभाष गांधी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng