कृषिवार्ताताज्या बातम्या
खरीप हंगाम पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवून आपले संभाव्य नुकसान टाळावे – तालुका कृषी अधिकारी श्रीमती पी. ए. चव्हाण
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2023-24 प्रधानमंत्री पिक विमा योजना माळशिरस तालुक्यामध्ये वरील प्रमाणे पिक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये आपल्या पिकाचा केवळ एक रुपया मध्ये पिक विमा उतरवून आपले होणारे संभाव्य नुकसान टाळावे व पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती पी. ए. चव्हाण तालुका कृषी अधिकारी माळशिरस यांनी केलेले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng