खा.डाॅ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांची स्वर्गीय जिजाबाई सातपुते यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट..
बीड (बारामती झटका)
बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांनी डोईठाण, ता. आष्टी, येथील स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे अल्पशा आजाराने दि. 26 जून 2023 रोजी दुःखद निधन झालेले होते. सातपुते परिवार यांची दि. 27 जून 2023 रोजी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम विठ्ठल सातपुते व विठ्ठल सातपुते यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मराठवाडा विभागामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक तरुण राजकारणात काम करीत होते. गोपीनाथ मुंडे परिवार आणि राम सातपुते यांचे राजकीय सलोख्याचे संबंध आहेत. स्व. जिजाबाई सातपुते यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर खासदार डॉक्टर सौ. प्रीतमताई मुंडे यांनी सातपुते परिवार यांची सांत्वन पर भेट घेतलेली घेऊन स्वतःच्या फेसबुकवर शोक भावना व्यक्त केलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng