Uncategorized

खुडूस येथे प्रथमच भव्य दिव्य कारवान श्वान प्रदर्शन

२७ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व डॉ. तुकाराम ठवरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांच्या वाढदिवसानिमित्त खुडूस ता. माळशिरस येथे प्रथमच भव्य दिव्य कारवान श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनामध्ये संपूर्ण राज्यातून कारवान श्वान प्रेमी सहभागी होणार असून सदर प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सदर प्रदर्शनात प्रथम क्रमांकास मा.श्री. सागर भैय्या दोलतडे (अल्पसंख्यांक आयोग सदस्य केंद्र सरकार दिल्ली) यांच्यातर्फे ५००१ रु., द्वितीय क्रमांकास मा.श्री. नागन्नाथ (आबा) पाटील (माजी सरपंच, नेवरे) यांच्यातर्फे ३००१ रु., तृतीय क्रमांकास मा.श्री. अर्जुन कोरटकर (उद्योजक, अकलुज) यांच्यातर्फे २००१ रु., चतुर्थ क्रमांकास मा.श्री. संग्रामभैय्या ठवरे पाटील यांच्यातर्फे १००१ रु. व पाचवे क्रमांकास मा.श्री. धनाजी ठोंबरे (हॉटेल जगदंबा) यांच्यातर्फे १००१ रु. तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह मा.श्री. योगेश ठवरे पाटील, रणजित झंजे पाटील व प्रविण लोखंडे यांचे वतीने देण्यात येणार आहेत.

सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तुषार (गोटू) ठवरे, प्रा. सतिष चौगुले, चंद्रकांत शिंदे, सुनिल ठवरे, अभिजित लोखंडे, हनुमंत ठवरे आदींसह अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ समिती व डॉ. तुकाराम ठवरे मित्र मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत असुन सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी 9960841111, 9503957275 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button