Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

खुडूस येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन

१ नंबर कुस्तीसाठी राजमाता केसरी चांदीच्या गदेचा मानकरी कोण ठरणार ?

खुडूस (बारामती झटका)

खुडूस ता. माळशिरस येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन देविदास वाघ व्यायाम शाळा खुडूस, वस्ताद तानाजी ठवरे, पै. बाजी नाना मित्रपरिवार, पै. पंजाबदादा मित्रपरिवार व समस्त ग्रामस्थ खुडूस यांच्या वतीने मंगळवार दि. ३०/०५/२०२३ रोजी दुपारी ३ वा. देविदास वाघ तालीम जवळ, खुडूस येथे करण्यात आले आहे.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामभाऊ सातपुते, यांच्या शुभहस्ते पै. देविदास वाघ कुस्ती संकुल केंद्र सभामंडप व लक्ष्मी मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच, शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिवतेसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर असणार आहेत.

यावेळी टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष पै. भैय्यासाहेब बंडगर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पै. युवराज केचे सर हे करणार आहेत. याविषयीच्या अधिक माहिती साठी ९९६०६०७१४९, ८७८८५४८२२६, ९५०३७७०१८७ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी मल्लसम्राट, वस्ताद आणि कुस्ती शौकीन यांनी या कुस्ती मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button