ताज्या बातम्यासामाजिक

‘गाई’ आणि ‘आई’ ची सेवा करा भरपूर काही मिळेल – नेहाताई भोसले

वाघोली (बारामती झटका)

पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने व भूमी अभिलेख पुणे विभागाचे उपसंचालक अनिल माने यांच्या मातोश्री स्मृतीशेष सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांचा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम मौजे वाघोली, ता. माळशिरस, येथे दि. १७ जुलै रोजी पार पडला. या कार्यक्रमावेळी शिवभक्त परायण नेहाताई भोसले यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. सदर कीर्तनात समाज प्रबोधन करत असताना शिवभक्त पारायण नेहाताई भोसले यांनी सर्व समाजातील नागरिकांनी आपल्या घरातील आई वडील व दारात असणाऱ्या देशी गाईची सेवा केल्यास आपणास काहीही कमी पडणार नाही, अशा प्रकारचे प्रबोधन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवभक्त परायण ह. भ. प. नेहाताई भोसले, पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभागाचे भुमिअभिलेखचे उपसंचालक अनिल माने, ह. भ. प. भजनदास मिसाळ, मृदुंगाचार्य अरुण शिंदे, ह. भ. प. बिभिषण मिले, विठ्ठलराव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अक्काताई माने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, कै. दत्तात्रय माने शेंडगे, कै. सोनाबाई माने शेंडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर पुष्कर माने, आर्वी माने, ऊर्वी माने, स्वरांजली माने यांच्या जिजाऊ वंदनेने मूळ कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवभक्त पारायण नेहा ताई भोसले यांचे कीर्तन होऊन त्या कीर्तनास मौजे लवंग, तांदुळवाडी, वाघोली, वाफेगाव, बाबुळगाव, संगम, खंडाळी येथील टाळकऱ्यांनी साथसंगत दिली. सरते शेवटी उपस्थित जनसमुदायाच्या वतीने दत्तात्रय माने शेंडगे यांनी स्मृतीशेष सोनाबाई माने शेंडगे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवर माने शेंडगे परिवाराचे पाहुणे, मित्रमंडळी, वाघोली गावातील ग्रामस्थ यांना माने शेंडगे परिवाराच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.

सदर कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे, सोलापूर जिल्हा काँग्रेस आय चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे, विष्णू मिसाळ, वसंतराव मिसाळ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर चे घोडके साहेब, माळशिरस भुमिअभिलेखचे माने साहेब, पुणे विभागातील कर्मचारी वृंद तसेच वाघोलीच्या सरपंच सौ. वृषाली माने, ग्रामपंचायतचे उपसरपंच पंडित मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य छायादेवी पाटोळे, अमोल मिसाळ, निंभोरे ता. करमाळा, चव्हाणवाडी ता. माढा, संगम, तांदुळवाडी, खंडाळी, अकलूज, वाकीशिवणे तसेच गावातील व वाघोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कै. दत्तात्रय माने शेंडगे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमोल माने यांनी करून आभार ग्रामपंचायत सदस्य योगेश माने यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button