Uncategorizedताज्या बातम्यामनोरंजन

गोरडवाडी गावात बेंदुर सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा…

गोरडवाडी गावचे बिनविरोध सरपंच विजय गोरड यांनी पारंपरिक उत्सवात सहभागी होऊन घेतला आनंद.

गोरडवाडी (बारामती झटका)

गेली दोन वर्ष कोरोनाने संपूर्ण जग संकटात होते. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आणि पाऊस चांगला पडल्याने बळीराजा आणखी जोमात आणि आनंदात आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या पारंपारिक सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. सबंध वर्षभर जीवाचा आटापिटा करुन बळीराजाबरोबर शेतातील औतकाडीची कामं करुन त्याव्यतीरिक्त अन्य कामालाही न थकता खांदा देणाऱ्या बळीच्या जनावरांच्या गोठ्यातील दावणीतील बैलांची हौस मौज पुर्ण करण्याचा सण आहे.

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे बैलपोळा म्हणजेच बेंदूर हा सण जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना व इतर जनावरांना स्वच्छ धुऊन त्यांची रंगरंगोटी करतात. तर बऱ्याच ठिकाणी शेळ्या मेंढ्यांसह पाळीव प्राणी रंगवले होते. तर काही गावात ट्रॅक्टरची पूजा देखील करण्यात आली. यावेळी गावातून वाजत गाजत बैलांच्या मिरवणूका काढल्या होत्या. गावात बैलपोळ्यानिमित्त राम मंदिरासमोर पारंपारिक गजी ढोल कार्यक्रम वेगवेगळ्या घाया लावून ताल धरून सनई आणि ढोलांच्या टिपरावर ताल धरून घाया खेळल्या जातात.

यावेळी सरपंच विजय गोरड, उपसरपंच शंकर यमगर, नानासाहेब हुलगे, हनुमंत गोरड, दत्तू गोरड, मल्हारी कर्णवर, आप्पा गोरड, भारत गोरड, दादा गोरड, धोंडीबा कोकरे, तुकाराम गोरड, बापू हुलगे, गणेश कोकरे, संतोष गोरड, संजय कोळेकर, दत्तू कोळेकर, मयूर सरगर, बापू गाढवे, पोपट गोरड, आजिनाथ कर्णवर, संतोष हुलगे, दादा कोकरे, भीमराव हुलगे आदिंसह गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button