Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

ग्रामपंचायतीचे पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

सोलापूर (बारामती झटका)

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. आयोगाने दि. ९/११/२०२२ च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे दि. २८/११/२०२२ ते दि. २/१२/२०२२ या कालावधीत संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मात्र, आता इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, म्हणून आयोग नामनिर्देशन पत्र पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ दि. २/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

वरील अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशन पत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RI Login मधून भरून घेण्यात यावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button