Uncategorized

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तहसील कार्यालयाकडून तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये उमेदवारांनी जी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत, त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –

१) उमेदवाराच्या ऑनलाईन भरलेल्या फॉर्म ची प्रत आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरीसह.
२) ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्या पानाची सत्यप्रत.
३) अनामत रक्कम पावती राखीव प्रवर्ग १०० रू. व सर्वसाधारण उमेदवारासाठी ५०० रु.
४) राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून त्या खात्याची पासबुकची छायाप्रत.
५) मत्ता व दायित्व, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे विहित नमुन्यातील घोषणापत्र.
६) दि. १२/०९/२००१ नंतरच्या हयात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे स्वघोषणापत्र.
७) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी जातीचे प्रमाणपत्र, (साक्षांकित प्रत) जात वैधता प्रमाणपत्र किंवा प्रत नसल्यास जात वैधता समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती.
८) सदर पोहोचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र.
९) दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.
१०) चिन्हाच्या प्राथम्यक्रमाचा नमुना अ.
११) ग्रामपंचायतीकडून उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रे घेऊन अर्जासोबत जोडावीत.
१२) १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींकडे किमान शालेय शिक्षणातील ७ वी इयत्तेचे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकार्याने प्रमाणित केल्याप्रमाणे ७ वी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
१३)
अ) ग्रामपंचायत (मालमत्ता कर सोडून) बे-बाकी ) थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
आ) ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र.
इ) शौचालय असल्याचे स्वयं साक्षांकित प्रमाणपत्र किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे किंवा त्याने पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र.
१४) इतर पुरावे –
अ) वयाची २१ वर्षे पूर्ण असल्याबाबतचा पुरावा
आ) रहिवासी पुरावा
इ) ओळखीचा पुरावा (आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स)
ई) शैक्षणिक पुरावे (अर्जात नमूद शैक्षणिक अर्हतेप्रमाणे पुरावे जोडावेत.)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button