ग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्याकडे मतदार संघातील विकास कामांना निधीची मागणी.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदार संघातील कामांना निधी उपलब्ध करण्याकरता मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन व पर्यटन कौशल्य विकास आणि उद्योजकता महिला व बालविकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोंढा यांची मतदार संघातील विविध विकास कामांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटी घेऊन मतदार संघातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामांना गती येणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक विकास कामांकडे दुर्लक्ष केलेले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी सभागृहामध्ये आक्रमक भूमिका मांडून विकास कामे मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.
सध्या भाजपच्या विचाराचे सरकार आलेले असल्याने माळशिरस विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार राम सातपुते यांनी संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू आहे कामांच्या मागण्या त्यावर संबंधित मंत्र्यांचे स्वाक्षरी घेऊन लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहणार आहे तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष लक्ष माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नाकडे आहे भविष्यामध्ये माळशिरस तालुक्यातील अनेक समस्यांना वाचा फुटून व विकास कामे होणार आहेत. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारातील अनेक लोकांची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे झालेली आहेत सरकार विचाराचे असल्याने माळशिरस तालुक्यातील अनेक विकास कामांना अच्छे दिन येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng