चि. सर्वेश प्रशांत राजे यांना आर्यभट्ट राष्ट्रीय गणित परीक्षेत सुवर्ण प्रमाणपञ.
लातूर (बारामती झटका)
लातूर येथील चि. सर्वेश प्रशांत राजे हा पोदार इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी असून त्याला आर्यभट्ट राष्ट्रीय गणित परीक्षेत सुवर्ण प्रमाणपत्र मिळाले आहे. बरेच विद्यार्थी शालेयतर परीक्षा द्यायला धजावत नाहीत. सर्वेशच्या या यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल व महाराष्ट्र शासनाच्या इतर उच्च अधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


चि. सर्वेश हा माजी प्राचार्य काशीनाथ राजे व अकलुज येथील जेष्ठ पञकार श्री. चंद्रकांत कुंभार यांचा नातू आहे. महत्वाचे म्हणजे मागील तीन महिन्यापूर्वीच तो नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. ही परिक्षा भारत सरकार मार्फत घेतली जाते. सर्वेश राजे याच्या यशाबद्दल त्याच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षांव आणि अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

