चि. सौ. कां. नितल दोशी, नातेपुते आणि चि. अरिहंत फडे, श्रीपुर यांचा शुभविवाह संपन्न झाला.
शाही शुभविवाह सोहळ्यास सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांची विशेष उपस्थिती…
माळशिरस ( बारामती झटका )
स्व. श्रीमानशेठ प्रेमचंद खुशालचंद दोशी यांची नात व श्रीमती अंकिता व स्व. अजित प्रेमचंद दोशी रा. नातेपुते यांची सुकन्या चि. सौ. कां. नितल दोशी आणि स्व. श्रीमानशेठ हिम्मतलाल हिराचंद फडे यांचे नातू व सौ. डॉक्टर शुभांगी व श्री. डॉ. सुनील हिम्मतलाल फडे रा. श्रीपुर यांचे चि. अरिहंत फडे यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 31/07/2022 रोजी दु. 12 वाजून 37 मि. या शुभमुहूर्तावर शाही विवाह सोहळा संपन्न झाला. सदर विवाह सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सुविद्यपत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी आवर्जून उपस्थित राहून नवदाम्पत्यांना त्यांचे भावी वैवाहिक जीवन सुखी व समृद्धी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. संस्कृतीताई सातपुते यांचा सन्मान दोशी व फडे परिवारांच्या वतीने करण्यात आला.


सौ. संस्कृतीताई यांनी खास आवर्जून दोशी व फडे यांच्या विवाहासह तालूक्यातील अनेक विवाहाच्या ठिकाणी जाऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद दिलेले आहे. लोकप्रिय आमदार संयुक्त मोर्चाच्या कार्यक्रमासाठी बिहार राज्यातील पटना या ठिकाणी दौऱ्यावर असल्याने सौ. संस्कृतीताई यांनी यशस्वी पत्नीची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी साखरपुडा झालेला असताना भावी पतीच्या प्रचारासाठी तालुक्यामध्ये फिरत होत्या. आत्ता तर लग्न होऊन मोठी जबाबदारी तालुक्याच्या आमदाराची पत्नी म्हणून आलेली आहे.
आ. राम सातपुते यांच्या गैरहजेरीमध्ये आपुलकी, प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते जपण्याची संस्कृती यशस्वीपणे संस्कृतीताई सातपुते जपत आहे. नवदांपत्यासह परिवारातील सर्वांना संस्कृतीताई यांच्या भेटीने आमदार राम सातपुते यांची उणीव भासत नाही. सौ. संस्कृतीताई विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावत असल्याने सातपुते दाम्पत्याविषयी माळशिरस तालुक्यात आत्मीयता व प्रेम भावना निर्माण होत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
