Uncategorizedताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी सक्तीच्या रजेवर जलजीवन टेंडरच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती स्थापन केली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या मागणीला लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जलजीवन मिशन टेंडरचा पर्दाफाश होणार

सोलापूर ( बारामती झटका )

‘हर घर नल जल से’, या जलजीवन मिशनच्या कामाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आमदारांनी केली. सर्वच आमदारांनी तक्रारी केल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना बुधवार दि. ५/११/२०२२ सक्तीच्या रजेवर पाठवले आणि झालेल्या टेंडर प्रक्रियेची चौकशी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या तीन अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश त्यांनी दिले. पंधरा दिवसात चौकशी अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.‌ सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जल जीवन मिशनच्या योजनेच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत एकाच मक्तेदाराला जास्त टेंडर दिले कसे ? त्या मक्तेदाराने बरीच कामे पेंडिंग ठेवली आहेत, असा प्रश्न उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी केली.

माजी सहकार मंत्री आ. सुभाष देशमुख यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व मोहोळचे कर्तव्यदक्ष आ. यशवंत माने यांनी बाजू उचलून धरली. या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोळी यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. कोळी यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र समोर बसलेल्या आमदारांची ओरड वाढल्याने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या तीन अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि या चौकशी समितीने पंधरा दिवसात अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना बुधवारपासून सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort