Uncategorized

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांना “आँखें तो खोलो स्वामी” म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे.

पंचायत समितीचे प्रशासन लहानपणी गोंडस शिंगरू वाटणारे वय वाढल्यानंतर गाढव धारण केल्यासारखा प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची जनतेची भावना झाली आहे..

सोलापूर (बारामती झटका)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने निवडणूक होऊन नूतन सभापती व उपसभापती यांच्या नेमणुका होईपर्यंत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार देण्यात आलेला आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रशासनाचा सुरुवातीस लोकाभिमुख कारभार चालवलेला होता. पंचायत समितीचे प्रशासन लहानपणी गोंडस शिंगरू वाटणारे जसजसा प्रशासनाचा कालावधी वाढल्याने शिंगरूचे वय वाढल्यानंतर गाढवाचे रूप धारण केल्यानंतर प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू केलेला असल्याची जनतेची भावना झालेली आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांना “आँखें तो खोलो स्वामी” म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सुरू असतो. अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या मार्फत राबविल्या जातात. पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांचे वर्चस्व असते. त्यामुळे पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर अंकुश असतो. मात्र, अनेक महिन्यापासून पंचायत समितीवर प्रशासकांची नेमणूक केलेली असल्याने प्रशासकीय कामकाजामध्ये प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झालेला आहे. पंचायत समितीमधील अधिकारी व गावस्वरूपी काम करणारे अधिकारी यांचे संगणमत होऊन गावातील विकास कामांसाठी निधीचा गैरवापर सुरू असल्याची जनतेची धारणा झालेली आहे. पंधरावा वित्त आयोगामधून जनतेच्या हिताची कामे घेणे गरजेचे असताना स्वहितासाठी कामे केली जात आहेत. मंजूर कामांना प्रशासकीय मंजुरी आल्यानंतर वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक ठिकाणी कामांमध्ये बदल करून सर्वसामान्य जनतेचे नुकसान करण्याचे काम सुरू आहे. प्रशासक नेमणूक झाल्यानंतर सुरुवातीस काही कालावधी लोकाभिमुख प्रशासन सुरू होते. निवडणुका पुढे गेलेल्या असल्याने प्रशासक यांचा कालावधी वाढला असल्याने मनमानी कारभारास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान होणार आहे. एखाद्या योजनेसाठी निधी आल्यानंतर पुन्हा त्याच योजनेला निधी उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणी असे गैरप्रकार झाले असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

सर्वसामान्य जनतेच्या हातात कागदपत्रे लागलेली आहेत. काही कागदपत्रे उपलब्ध करण्याचे सुरू आहे. जनतेची धारणा झालेली आहे, पंचायत समितीचे प्रशासन सुरुवातीस लहानपणी गोंडस शिंगरू वाटणारे जसजसा प्रशासक कालावधी वाढल्यानंतर गाढवाचे रूप धारण केल्यासारखा प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची जनतेची भावना झालेली आहे. याला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांना “आँखें तो खोलो स्वामी” म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे.

जनतेकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर नंगानाच करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आपल्याकडे मनमानी कारभाराची उपलब्ध असलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी व माहिती देण्यासाठी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 9850104914 या नंबरवर संपर्क साधावा, असे सर्वसामान्य जनतेस आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button