Uncategorizedताज्या बातम्या

टेंभूर्णीत शिवविचार प्रतिष्ठानचा दसरा आणि मेळावा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळा

टेंभुर्णी (बारामती झटका)

‘व्यसनमुक्त सदाचारी हाच खरा समाजसुधारक, एक विचार दुर्गसंचार जय शिव विचार’ हे ब्रिद वाक्य घेऊन व समाजातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे व छत्रपती शिवरायांचे कार्य अभ्यासून एक सृजन नागरीक निर्माण होण्याच्या उद्देशाने मागील वर्षी स्थापन करण्यात आलेल्या शिव विचार प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त टेंभुर्णी ता. माढा येथे गुरुवारी सायंकाळी 5 वा कुर्डूवाडी रोड येथील खुल्या मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आ. बबनदादा शिंदे व आ‌. संजयमामा शिंदे यांचे उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय महाराज खटके पाटील यांनी दिली.

या मेळाव्यातून विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल सौ. स्मिता पाटील जिजाऊ सामाजिक, अॅड. बाबुराव हिरडे, प्रा. संजय साठे सामाजिक साहित्यीक, सोमनाथ हुलगे कृषीभूषण, बाळासाहेब मानेव्यसनमुक्त यांना पुरस्कर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर साहित्यिक डॉ. महेंद्र कदम सर व हर्षल बागल यांचे व्याख्यान होणार आहे.

तसेच मावळा ग्रुप कुर्डुवाडी, महिला दांडिया सांजोबा, लेझिम संघ पालवण येथील लेझिम पथक, मुली तलवारबाजी मुले बबनराव शिंदे प्रशाला अकोले बु.यांचे वतीने साहसी कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश व्यवहारे, सचिन पवार, पाटलूभाऊ खटके, सागर खटके, विजय खटके साहेब प्रवक्ते शिव विचार प्रतिष्ठान, योगेश पराडे-पाटील, हनुमंत ढवळे, विजय (बापू) खटके पाटील आदिजण परिश्रम घेत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

  1. Great read! The author’s analysis was spot-on and thought-provoking. I’m looking forward to hearing what others think. Feel free to visit my profile for more discussions.

Leave a Reply

Back to top button