Uncategorizedताज्या बातम्या

डोंबाळवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना तक्रारीवरून शिवीगाळ व धमकी…

डोंबाळवाडी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल नारायण माने यांचु अमोल पांडुरंग रुपनवर यांच्या विरोधात नातेपुते पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल

डोंबाळवाडी (बारामती झटका )

डोंबाळवाडी ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल नारायण माने रा. डोंबाळवाडी, यांनी जिल्हा परिषद शाळेत चौदावा व पंधरावा वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेत झालेल्या निकृष्ट कामाबद्दल चौकशी व्हावी, यासाठी ग्रामपंचायत गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्याने अमोल पांडुरंग रुपनवर रा. डोंबाळवाडी, यांनी मोबाईलवरून विनाकारण घाणेरड्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे, अशा आशयाची फिर्याद देवून नातेपुते पोलीस स्टेशन येथे रजिस्टर दाखल केलेली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 002/2023 भादवि कलम 507 प्रमाणे 02/01/2023 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे. फिर्यादी व आरोपी एकाच गावातील असून दोघांचीही नावे योगायोगाने “अमोल” आहेत.

हकीगत अशी आहे की, माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या मुलभूत सुविधा कामासाठी निधी मिळूनसुद्धा कामे करण्यात आलेली नाहीत.
शाळा व्यवस्थापन समितीने माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीमार्फत चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून शाळेमध्ये करण्यात आलेल्या कामांची चौकशी होण्यासाठीचे निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग भरत असून इथे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाड्यावस्थांवरून शाळेत मुले येत असतात, पण त्यांच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सुविधा देखील या शाळेमध्ये उपलब्ध नाहीत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनातून ग्रामपंचायतीमार्फत १४ वा व १५ वा वित्त आयोगातून विकास कामे होणे अपेक्षित आहेत, पण ही कामे होतच नाहीत आणि जी काही थोडीफार कामे झाली आहेत ती देखील निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक यांना विनंती करण्यात आली होती पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी माळशिरस यांच्याकडे तक्रारी निवेदन दिले आहे. अशी बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर याचा राग मनात धरून आरोपी अमोल यांनी फिर्यादी अमोल यांना शिवीगाळ व दमदाटी केली आहे. आता गटविकास अधिकारी, आणि गटशिक्षण अधिकारी यावर काय भूमिका घेत आहेत, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button