दिव्यांग सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री. अंकुश कोळेकर यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोध घेणारी बातमी…
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री स्वर्गीय गणपतआबा यांच्या विचारधारेशी मिळतेजुळते असणारे दिव्यांग कोळेकर आबा यांची ‘द ग्रेट भेट’
गोरडवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुका कृषी कार्यालयात २०१९ साली कृषी पर्यवेक्षक पदावर सेवानिवृत्त झालेले श्री. अंकुश तुकाराम कोळेकर उर्फ आबा यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोध घेणारी बातमी आहे.
श्री. अंकुश तुकाराम कोळेकर यांचे मूळगाव तांबवे, ता. माळशिरस आहे. ज्यांनी कृषी विभागामध्ये आपली सेवा केलेली आहे सध्या ते सेवानिवृत्त असून पेन्शन सुरू आहे. त्यांना दोन मुले आहेत. निखिल कम्प्युटर तर अनिकेत बीएससी ऍग्री आहे. निखिल शेती करतात तर, अनिकेत यांचे कृषी दुकान सुरू आहे.
गोरडवाडी येथे श्री बिरोबा देवाची सालाबादप्रमाणे यात्रा सुरू आहे.
गोरडवाडीचे माजी सरपंच रामचंद्र गोरड यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाच्या निमित्त कृषी विभागातील अंकुश कोळेकर, रणजीत वलेकर आणि शिंदे यांच्या समवेत माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय हुलगे यांच्यासोबत योगायोगाने भेट झाली. सेवानिवृत्त झाल्यानंतर आबांची फार दिवसांनी भेट झालेली होती. सध्या आबा इंदापूर येथे वास्तव्यास आहे. चर्चा करीत असताना आबांना विचारले कसे आला. त्यावेळेस त्यांनी दिलेले उत्तर बोध घेणारे होते. इंदापूर ते अकलूज 45 रुपये व अकलूज ते माळशिरस 25 रुपये तिकीट दाखवले. आबा हे दिव्यांग आहेत, तरीसुद्धा त्यांनी सध्या एसटी कर्मचारी यांची सुरू असलेली हेळसांड होत असून आपला काहीतरी हातभार लावावा म्हणून त्यांनी दिव्यांगाचा लाभ न घेता पूर्ण तिकिटाचे पैसे देऊन इंदापूर ते माळशिरस असा एसटीने प्रवास करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. समाजाची मानसिकता कशीही असो, स्वतःची मानसिकता अशी ठेवलेली असल्याने दिव्यांग आबा कोळेकर यांच्याविषयी मनामध्ये अभिमान आहे.
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गणपतआबा यांनी सुद्धा माझी परिस्थिती चांगली आहे. सर्व सामान्यांना फायदा व पेन्शन द्या, असे सांगणारे स्वर्गीय आबांची आठवण सेवानिवृत्त कृषी सहाय्यक दिव्यांग कोळेकरआबा यांच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांविषयी असलेली तळमळ पाहून खरंच समाजामध्ये बोध घेणारी बातमी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng