Uncategorizedताज्या बातम्या

दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांचा बाळासाहेब वाघमोडे पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्याहस्ते सत्कार

माळशिरस (बारामती झटका)

तरंगफळ (ता. माळशिरस) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले कै. मारूती बिरू जानकर तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जगुबाई जानकर यांचे चिरंजीव, नेहमी समाजकार्य व दिव्यांग सेवेत कार्यरत असून स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहीते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग सेवाभावी संस्था तरंगफळचे अध्यक्ष गोरख मारूती जानकर गेल्या ३० वर्षापासून दिव्यांगाची सेवा करत आहेत. त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग खूप मोलाचा आहे. जागतिक अपंग सहाय्यता दिनानिमित्त त्यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले जाते. त्यांनी माळशिरस येथील माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका केंद्र व मार्गदर्शन केंद्र यास जवळपास 45 हजार रुपयांचा प्रिंटर व इतर साहित्य भेट दिले हो.ते त्याचा फायदा ज्ञानसेतूमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना होत आहे. त्यामुळे ज्ञानसेतू अभ्यासिका केंद्र व मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यामार्फत त्यांचा सन्मान बाळासाहेब वाघमोडे पाटील पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हरेश सुळ उपजिल्हाधिकारी पुणे, बाबासाहेब वाघमोडे उपजिल्हाधिकारी कोल्हापूर, उत्तम पवार संचालक द लॉयन अकॅडमी पुणे, भारत शेंडगे से. नि. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. सुशील बारी संचालक स्पॉटलाईट अकॅडमी पुणे, विकास काळे जीएसटी उपायुक्त मुंबई, आप्पासाहेब समिंदर उपजिल्हाधिकारी मंगळवेढा, दयानंद गोरे मुख्याधिकारी अकलूज, हरिश्चंद्र वाघमोडे वनाधिकारी सातारा, महादेव टेळे सहाय्यक संचालक वित्त व लेखा विभाग नवी मुंबई, माधव खांडेकर मुख्याधिकारी नातेपुते, गणेश चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अकलूज, सोमनाथ कर्णवर पाटील माळशिरस तालुका प्रतिष्ठान अध्यक्ष तथा सहायक पोलीस निरीक्षक ठाणे, सुनील कर्चे समाज कल्याण अधिकारी तथा प्रतिष्ठान सचिव, हनुमंत वगरे ग्रामविकास अधिकारी तथा प्रतिष्ठान सहसचिव आदी उपस्थित होते.

त्यांना अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मुंबई यांच्यावतीनेही त्यांना गौरवण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक मदनसिंहजी मोहीते पाटील, संस्थेचे आधारस्तंभ उपसभापती अर्जुनसिंग मोहीते पाटील, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, सोलापूर जिल्ह्याचे महामंत्री तथा जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि संस्था कार्यरत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button