धक्कादायक बातमी : माळशिरस तालुक्यात दोन शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोर हमरीतुमरी, वाद मिटला तरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू पालकांचा आक्रमक पवित्रा….

जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घटण्यासाठी शिक्षकच जबाबदार अशी अवस्था झालेली आहे..
दहिगाव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील दहिगाव गावातील शेरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोर भांडणाची हमरीतुमरी सुरू होती. विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी, शिक्षकांचा वाद मिटला तरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घटण्यासाठी शिक्षकच जबाबदार, अशी बिकट अवस्था जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची झालेली आहे.
शेरेवाडी दहिगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी 10 पट आहे. अनेक पालकांनी आपली मुले नातेपुते व इतरत्र शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी घातलेली आहे. जिल्हा परिषद शाळेचा पट दिवसेंदिवस घटत आहे. शिक्षकांचा वाद असाच राहिला तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. उद्या पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख येणार आहेत. त्यावेळेस पालक दोन शिक्षकांची बदली करा, चांगल्या शिक्षकांची नेमणूक करा, अन्यथा दुसऱ्या शाळेमध्ये आमच्या मुलांची व्यवस्था करावी लागेल, अशा मानसिकतेमध्ये आहेत. शिक्षकांची वादावादी कशामुळे झाली, याचे मूळ शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शोधून त्यांच्यावर कारवाई करावी व चांगल्या शिक्षकांची नेमणूक करावी, अशा मागणीची दहिगाव शेरेवाडी परिसरात पालकांमधून चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
