कृषिवार्ताताज्या बातम्या

नवनाथ लामकाने या शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीवरती अज्ञात व्यक्तीकडून २-४ डी औषध फवारणी.

परिते (बारामती झटका)

माढा तालुक्यातील मौजे परिते ता. माढा येथील शेतकरी नवनाथ कोंडीबा लामकाने यांच्या परिते – बेंबळे रोडलगत असलेल्या शेतात ऐण भरात आलेल्या ढोबळी मिरचीवरती अज्ञात व्यक्तीने रात्री २-४ डी औषधाची फवारणी करत नुकसान केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

सविस्तर माहितीनुसार नवनाथ कोंडीबा लामकाने यांची परिते -बेंबळे रोडलगत १५ एकर शेती असुन त्यांनी आपल्या शेतामध्ये १ एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड केली होती. अतिशय कष्टाने जोपासलेली ही मिरची ऐण पिकाच्या भरात आलेली असतानाच काल रात्री खुणशी प्रवृत्तीच्या अज्ञान व्यक्तीने या मिरची प्लाटवरती २-४ डी औषधाची फवारणी करत लामकाने यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरील शेतकरी नवनाथ लामकाने यांचे घर सदरील शेती क्षेत्रापासुन अर्धा किलोमीटर अंतरावर असुन दिवसभराची कामे उरकून नवनाथ लामकाने हे आपल्या घरी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या अतिशय कष्टाने जोपासलेल्या मिरचीवरती २-४ डी औषधं फवारणी करत जवळपास तीन ते चार लाखांचे नुकसान केले आहे. आज चालूला मार्केटमध्ये ढोबळी मिरचीला मोठ्या प्रमाणात दर मिळत असुन शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेले असताना अशी अनपेक्षित घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्यांनी कोणी आमच्या मिरचीवरती औषध फवारणी केली त्यांचे मानसिक समाधान झाले असेल तर, त्यांनी इथुन पुढे इतर कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशी अपेक्षा नवनाथ लामकाने यांनी व्यक्त केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button