Uncategorized

नातेपुते भाजप शहर व नगरपंचायतीच्या वतीने आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा सन्मान संपन्न झाला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न.


नातेपुते ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर प्रथमच नातेपुते शहरात आगमन झाले बद्दल भारतीय जनता पार्टी नातेपुते शहर व नातेपुते नगरपंचायत यांच्या वतीने मंत्री महोदयांचा सन्मान भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.


आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे सदिच्छा भेट दिल्यानंतर शिवसेना तालुका कार्यालय उद्घाटन व कोविड योद्धांचा सन्मान कार्यक्रमाप्रसंगी भव्य व्यासपीठावर नातेपुते भाजप शहर व नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे नातेपुते शहर अध्यक्ष भैय्यासाहेब चांगण नातेपुते नगरीचे माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक एडवोकेट भानुदास राऊत नातेपुते नगरीचे माजी उपसरपंच व विद्यमान नगरसेवक दादासाहेब उराडे, नगरसेवक दीपकशेठ काळे, नगरसेवक रावसाहेब पांढरे, नगरसेवक माऊली उराडे, नगरसेवक शशिकांत बरडकर, नगरसेवक अजित चांगण, युवा नेते संजय उराडे, सतीश बरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort