Uncategorizedताज्या बातम्या

निवडणूक आयोगाकडून ‘रिमोट व्होटिंग मशीन’ चे आज प्रात्यक्षिक

आठ राष्ट्रीय व ५७ प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण

मुंबई (बारामती झटका)

नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या ‘रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ चे (आरव्हीएम) प्रात्यक्षिक सोमवारी होणार आहे. याकरिता, मान्यताप्राप्त आठ राष्ट्रीय व ५७ प्रादेशिक पक्ष नेत्यांना आमंत्रित केले आहे. देशाच्या विविध राज्यात व शहरातील मतदारांना ‘आरव्हीएम’ द्वारे हक्क बजावता येणार आहे. नव्या ‘आरव्हीएम’ ला काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे.

देशातील अनिवासी व स्थलांतरित नागरिकांना ‘आरव्हीएम’ द्वारे मतदान करण्याचे प्रात्यक्षिक निवडणूक आयोग दाखवणार आहे. यावेळी सर्वच शंकांचे निरसन केले जाणार आहे. ‘आरव्हीएम’ च्या प्रात्यक्षिकावेळी निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञान तज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘आरव्हीएम’ च्या वापराची परवानगी घेण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत राजकीय पक्षांनी आपापले म्हणणे लिखित स्वरूपात मांडण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले. ‘आरव्हीएम’ चा प्रयोग यशस्वी झाल्यास बाहेरील शहर व राज्यात असणाऱ्या पात्र मतदारांना हक्क बजावता येणार आहे. प्रत्यक्षात मतदानासाठी त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाही, असे अधिकारी म्हणाले.

सर्वप्रथम ७२ मतदार संघात रिमोट व्होटिंग ची सुविधा दिली जाणार आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय व कामाचे ठिकाण यामुळे अनेकदा नागरिक मतदान करण्यासाठी उदासीनता दाखवतात. परंतु, मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी हा नवा हातखंडा परिवर्तनशील सिद्ध होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे म्हणणे आहे. ‘आरव्हीएम’ एम – ३ हे ईव्हीएम चे सुधारित मॉडेल आहे. याद्वारे दुरस्थ मतदान केंद्रांवरून हक्क बजावता येणार आहे‌. दरम्यान, नव्या ‘आरव्हीएम’ ला काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. “आरव्हीएम’ अर्धवट आहे, स्थलांतरित कामगारांची व्याख्या सरकारने स्पष्ट केली नाही, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क कसा देता येईल ?, असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button