समाजसेवेचा वसा घेतलेल्या बादशहा शेख यांना आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्लीच्या राष्ट्रीय भारत भुषण पुरस्काराने सन्मानित.

अकलूज (बारामती झटका)
अकलूज शहरामधील सर्वांच्या परिचयाचे रहिमतुल्ला शेख यांचे सुपुत्र बादशहा शेख यांनी आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वसा तसाच पुढे चालू ठेवला आहे.
कायमस्वरूपी अपंगांना मदत करून त्यांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. दिनदुबळ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवुन देणे, दिव्यांग बांधव, विधवा महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळवुन देणे, निराधारांसाठी हॉस्पिटलची मदत करणे अशा त्यांच्या भरीव कार्याची दखल घेऊन दिल्ली येथे महाराष्ट्र सदन या ठिकाणी “आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन दिल्ली” या संस्थेने या कार्याची दखल घेऊन त्यांना दि. ९ मार्च २०२५ रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते बादशहा शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

दिल्ली येथील त्यांना ही पुरस्कारांची दुसरी वेळ असल्यामुळे माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक आणि स्वागत होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.