कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी धानुका तज्ज्ञांचा संवाद

काळमवाडी (बारामती झटका)

काळमवाडी, ता. माळशिरस येथे धानुका ॲग्रीटेक लिमिटेड चे दिल्ली येथील बुरशीनाशक उत्पादन पोर्टफोलिओ व्यवस्थापक श्री. साकेत कुमार यांनी प्रगतिशील शेतकरी श्री. गणेश आवताडे (रा. काळमवाडी) यांच्या निवासस्थानी आयोजित चर्चासत्रात माळशिरस तालुक्यातील कोळेगाव, फळवणी व काळमवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी डाळिंब पिकातील सध्याची परिस्थिती, रोग व कीड व्यवस्थापन, उत्पादनवाढ तसेच दर्जेदार फळनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी परिसरातील डाळिंब बागांना भेट देऊन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच सध्या बहुतांश डाळिंब बागा तोडणीच्या अवस्थेत असून, फळांची गुणवत्ता, आकर्षक चमक, शायनिंग वाढविण्यासाठी लस्टर या बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन श्री. साकेत कुमार यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमास धानुका कंपनीचे सोलापूर विभाग एरिया मॅनेजर श्री. प्रदीप बनसुडे, अकलूज विभाग टेरिटरी मॅनेजर श्री. दिपक वाघमोडे तसेच धानुका डॉ. श्री. धनाजी शिकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध विषयांवर चर्चा केली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button