सौ. जिजामाला नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या, भाजपचे नेते व कार्यकर्त्यांची मने जिंकून गेल्या…

खासदार सुन, खासदार धर्मपत्नी, नगराध्यक्ष भावजय, स्वतः ॲड. मा. जिल्हा परिषद सदस्या कारखान्याच्या विद्यमान चेअरमन असुन सर्वसामान्य राहणीमान व सभ्य वर्तनुकीमुळे आपलेपणा वाढला….
माळशिरस (बारामती झटका)
सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, स्वराज कारखान्याच्या विद्यमान चेअरमन ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या. कोणत्याही प्रकारे बडेजाव न करता सर्वसामान्य महिलांसारखी साधी राहणीमान, बोलण्यात नम्रता, वागण्यात आदरातिथ्य, सभ्य वर्तणुकीमुळे माळशिरस तालुक्यातील विशेष करून महिला भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व भाजपचे नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये आपलेपणा वाढला आहे..

सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर याचा दौरा माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदार संघातील चौदा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, शाळेतील विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या, दप्तर, ट्रॅकसूट, गणवेश, बुट यासह अनेक शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन यौध्दा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल उर्फ भैय्यासाहेब मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. माळशिरस तालुक्यात आगमन झाल्यानंतर महाळूंग गावचे ग्रामदैवत श्री यमाई देवी चे दर्शन घेऊन जांभूड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे योद्धा फाउंडेशनच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना साहित्य वाटून त्यांच्याशी हितगुज साधला. जिजामाला यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दणाणून गेलेला होता. मार्मिक भाषणातून उपस्थित शिक्षक, पालक, मान्यवर व लहान मुले यांना मंत्रमुग्ध केलेले होते. जिजामाला यांनी साहित्य वाटप करीत असताना लहान मुलीला उचलून घेतल्यानंतर उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले होते.
जांभूड कार्यक्रम आटोपून जांभूड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राहुल खटके पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली. त्यावेळी जांभूड गावच्या विद्यमान सरपंच सौ. स्वातीताई राहुल खटके त्यांनी त्यांचा सन्मान केला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील खंडाळी गावांमध्येही अशाच प्रकारे कार्यक्रम केला. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय लोकनेते सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अमृतराज व अमरसिंह माने देशमुख परिवार यांनी स्वागत केले. पिलीव पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता पुकळे यांच्या पिलीव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी सन्मान करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी एसएनडीटी संस्थेचे चेअरमन तथा नातेपुते नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख परिवार यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. अनेक विविध राजकीय विषयांवर चर्चा करून सायंकाळी फलटण येथील राजभवन निवासस्थानी रवाना झाल्या…

सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार स्वर्गीय लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या सुनबाई, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी, फलटण नगर परिषदेचे थेट जनतेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या भावजय, जिजामाला आहेत. त्या स्वत: ॲडवोकेट आहेत, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत, विद्यमान स्वराज कारखान्याच्या चेअरमन आहेत, असे असूनसुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून गेलेल्या असल्याने जिजामाला नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या अन भाजपचे नेते व कार्यकर्त्यांची मने जिंकून गेल्या, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



