मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांचा सन्मान केला…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोहिनकर यांच्या केलेल्या कामाची मोजदाद करून कामाची उंची आणखी वाढली…
सोलापूर (बारामती झटका)
गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाची ऐतिहासिक अशी आषाढी एकादशी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. दरवर्षी या आषाढी वारीचे महत्व वाढत असून वारकऱ्यांना सुविधा, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो. सोलापूर जिल्हा परिषदेचे कॅप्टन म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे तर महत्त्वाचे ठरतातच मात्र, त्यांच्या सोबत काम करणारे इतर सहकारी अधिकारी हे पडद्यामागचे हिरो असतात.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार समाधान आवताडे यांची आवर्जून उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी कोहिनकर यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचा सन्मान केल्याने कोहिनकर यांच्या कामाची उंची आणखीच वाढल्याचे दिसून येते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी मागील तीन आषाढी वारीमध्ये अतिशय मेहनत घेतली आहे. वारी मध्ये बांधकाम विभागाचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. मागील वर्षीपासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जर्मन हँगर ही संकल्पना समोर आली.
यंदा सातारा, पुणे आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यात वारी मार्गावरील गावात जर्मन हँगरचे काम जिल्हा परिषदेने पाहिले. त्यामध्ये कोहिनकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, नवे रस्ते हे सर्व काम करताना कोहीनकर यांनी वारकरी हाच व्हीआयपी म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आषाढी वारीतील संदीप कोहिणकर पडद्यामागील खरे कलाकार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या कामाची पोचपावती देऊन अधिकारी यांचे मनोबल वाढवले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



