आषाढीवारी २०२६ निमित्त ग्रामपंचायत लक्ष्मी-टाकळी यांच्या वतीने नवीन कराड नाका ठाकरे चौक येथे वारकऱ्यांसाठी मोफत सेवा केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन

पंढरपूर (बारामती झटका)
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लक्ष्मी-टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने ठाकरे चौक (नवीन कराड नाका) येथे उभारण्यात आलेल्या मोफत सेवा केंद्राचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.
या सेवा केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, फूट मसाज, कपडे प्रेस, शौचालय सुविधा, फूट ज्यूस, पिण्याचे पाणी, चहा, फराळ आणि उपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे, तसेच आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्य संस्कृती सातपुते, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार वाघमारे, पंचायत समिती पंढरपूरचे सभापती शुभम आगावणे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच औदुंबर दत्तात्रय ढोणे, उपसरपंच समाधान भागवत देठे, ग्रामविकास अधिकारी जयंत जयकुमार खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य, सागर भैया सोनवणे, महादेव पवार, आशाताई देवकते, विजयमाल वाळके, रुपाली कारंडे सुरेश टिकोरे, सागर कारंडे, विकास देवकते सचिन वाळके, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून हा सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
वारीच्या काळात पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी लक्ष्मी-टाकळी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री ग्रामविकास, पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



