मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची केली महापूजा

आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती माने या दांम्पत्याला मिळाला…
पंढरपूर (बारामती झटका)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली. यावर्षी आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाबासाहेब माने या दांम्पत्याला मिळाला आहे.

दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली जाते. या पूजेला मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला ‘मानाचे वारकरी’ म्हणून बसण्याचा बहुमान दिला जातो. त्यानुसार यंदा गौरगावच्या माने दांपत्याची मंदिर समितीकडून निवड करण्यात आली. आपल्या कष्टकरी आणि साध्या जीवनशैलीसह गेली अनेक वर्षे वारीची परंपरा जपणार्या माने दांपत्याने या निवडीनंतर आनंद व्यक्त केला.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, “आपल्या भक्तासाठी विटेवर ऊभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. यावेळी 25 किमी रांग आहे, यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्या निमंत्रणाविना भक्त पायी प्रवास करुन येतो. ही माझी पूजा नाही, ही विठ्ठल भक्तांची पूजा केली. येणारा वारकरी हा शेतकरी आहे. तसेच सर्व प्रकारच्या क्षेत्रातून येणारा वारकरी आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. “या वर्षी 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. वीजबिल माफ केली. सर्वांना विनंती आहे पांडुरंगाच दर्शन घ्यायला अनेक लोक येतात. कितीही लोक आले तरी आता योग्य नियोजन केलं जाणार आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



