Uncategorized

पत्र व्यवहार करून चालणार नाही प्रत्यक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.

माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुरंदावडे सदाशिवनगर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे, उपाध्यक्ष हनुमंत धाईंजे यांनी निवेदन दिले .

फलटण ( बारामती झटका )


माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज शनिवार दि. 30/07/2022 रोजी फलटण येथील जनसंपर्क कार्यालयात पुरंदावडे सदाशिवनगर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे, उपाध्यक्ष हनुमंत धाईंजे, समन्वय सुभाषराव सुदने यांनी निवेदन दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व इतर उपस्थित होते.

  कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू आळंदी पुणे पंढरपूर रस्त्याच्या महामार्ग विस्तारीकरणात सदाशिवनगर पुरंदावडे दरम्यान प्लेटचा उड्डाणपूलाचे काम सुरू झालेले आहे. व्यापारी व ग्रामस्थांच्या लक्षात आले प्लेटच्या उड्डाणपूलामुळे दोन्ही गावाचे अस्तित्व धोक्यात येऊन व्यापारी वर्गातील लोकांना स्थलांतरित झाल्याशिवाय गत्यंतर नाही. अशी परिस्थिती उद्योग व्यवसायिक व स्थानिकांची झालेली आहे. ग्रामस्थांचा उड्डाणपुलाला विरोध नाही मात्र, प्लेट ऐवजी कॉलममध्ये उड्डाणपूल तयार करावा, या मागणीसाठी पुरंदावडे सदाशिवनगर गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी, ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचा रास्ता रोको संपन्न झाला. या रास्ता रोकोमध्ये जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या लेकी दोन्ही गावाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी रणरागिनी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आलेल्या होत्या. आजपर्यंतच्या आंदोलन व मोर्चाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जैन समाजातील भगिनी रस्त्यावर काळे झेंडे घेऊन रणरणत्या उन्हात सहभागी झालेल्या होत्या. आजपर्यंत झालेल्या विषयावर चर्चा करण्यात आली. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देण्याची मागणी केली होती.

अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक घोडके यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नुसता पत्रव्यवहार करून चालणार नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संघर्ष समिती शिष्टमंडळा समवेत आयोजित करून दोन्ही गावातील प्रश्न सुटणार आहे. मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न सुटणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून माहिती मिळालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button