पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक वर्गात न शिकविता घेताहेत चक्क खाजगी क्लासेस
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेज विज्ञान व कला शाखेचे कॉलेज आहे. यामध्ये विज्ञान शाखा गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरु असुन अद्यापही विना अनुदानीत असल्यामुळे अॅडमिशनसाठी प्रत्येक वर्षी ८००० हजार रूपये प्रवेश फी घेतली जाते.
खरे तर रयत शिक्षण संस्थेचे कॉलेज असल्याने पालकांचा फार मोठा विश्वास आहे. अण्णांनी सर्व सामान्य विद्यार्थांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. पण सध्या याठिकाणी शिक्षणाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. याठिकाणी विनाअनुदानित कॉलेजवर शिकविणाऱ्या शिक्षकांना पालकच पैसे देतात. पण गेल्यावर्षी याठिकाणी संस्थेने पाठविलेले भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र विषयांच्या शिक्षकांचा कारनामा काही औरच असून वर्षभर एकदाही प्रॅक्टीकल घेतलेच नाही तर दुसऱ्या सत्रात भौतिकशास्त्राचे ६ प्रकरणे वर्गात शिकविलेच नाहीत. रसायनशास्त्र विषयाचे ४ प्रकरणे शिकविले नाहीत. मग विद्यार्थ्यांनी काय करायचे, ह्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान या शिक्षकांनी केले आहे.
उलट या शिक्षकांनी वर्गात न शिकविता तुम्ही आमच्याकडे बाहेर खाजगी क्लासेसला या, त्याठिकाणी आम्ही तुम्हाला व्यवस्थीत शिकवीतो, असे म्हणत खाजगी क्लासेस घेत आहेत. या संबंधित घडलेल्या व चालू प्रकाराबाबत पालकांनी कॉलेजचे प्राचार्य तथा शाखाप्रमुख यांना मोबाईलवरुन तक्रार केली. पण त्यांनी त्या पालकालाच असे काही घडलेच नाही. तुम्ही कोणाचे तरी ऐकुन तक्रार करता म्हणून, पालकांनाच समजून घेण्याचा उलट सल्ला दिला.
तर याविषयी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव साळुंखे यांना पालकांनी व विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार करून या शिक्षकांच्या कारनामा सांगीतला असता सदर शिक्षकांवर मी कारवाई करण्यास शाखाप्रमुख यांना सांगीतले आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेत खाजगी क्लासेस घेण्यास बंदी आहे. मी कोणासही याबाबत पाठीशी घालणार नसल्याचे सांगीतले. तर याविषयी स्थानिक स्कूल कमीटी सदस्य संग्राम पाटील यांच्याकडे तक्रार केली, असता मी याविषयी शाखाप्रमुख यांना सांगीतले आहे, असे सांगितले. याठिकाणी सदरचे शिक्षक कॉलेजकडे न जाता पुर्णपणे खाजगी क्लासेसवर जास्त दिसत आहेत. सदरच्या शिक्षकांवर ताबडतोब कारवाई करावी अशी, मागणी पालक, विद्यार्थी यांनी लेखी निवेदनाद्वारे रयत शिक्षण संस्थेकडे केली आहे. संस्थेने याची ताबडतोब दखल घ्यावी व नवीन शिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा पालकांनी व विद्यार्थ्यांनी दिला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng