पिसेवाडी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न…
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस येथे धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील व अर्जुनसिंहदादा मोहिते पाटील व श्रीराजभैया माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय वाघजाई क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन धैर्यशील भैया मोहिते पाटील व अर्जुनसिंह दादा मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजय भाकरे, अमरसिंह माने देशमुख, उमेश भाकरे, श्रीकांत काका देशमुख, तानाजी सावंत, अशोक पिसे, सत्यवान पिसे, माऊली शेंडे, नवनाथ भाकरे, भीमराव नाळे, बंडू पिसे, शंकर पिसे, रामभाऊ पिसे, भागवत पिसे, तानाजी पिसे, सुमंता गायकवाड, प्रकाश पवार, बाळू गायकवाड, कांतीलाल नाळे, सुनील गायकवाड, सिद्धेश्वर सावंत, नितीन सावंत, भैय्या सावंत, गणेश सावंत, पोपट भाकरे, रामभाऊ भाकरे, भाकरे समाधान, विजय पवार, भैय्या कोडक, सचिन भाकरे, रमेश भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक माळेगाव संघ, द्वितीय क्रमांक वालचंदनगर संघ तर तृतीय क्रमांक पिसेवाडी या संघाने पटकवला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सत्यशील भैया मोहिते पाटील यांनी केले.
ही स्पर्धा पार पाडण्यासाठी दीपक भाकरे, सौरभ बनकर, समाधान पिसे, विशाल भाकरे, किरण भाकरे, विजय बनकर, सतिश पिसे, प्रशांत धोत्रे, माऊली शेंडे, निसार मुलाणी, रोहित भाकरे, यश क्षीरसागर, विकास भाकरे, रुक्मानंद बनकर, अजय पिसे, अजित बनकर आदींनी परिश्रम घेतले.
तसेच स्पर्धेला उमेश भाकरे, धनंजय भाकरे यांच्यासह अनेकांचे सहकार्य राहिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ao tentar espionar o telefone de alguém, você precisa garantir que o software não seja encontrado por eles depois de instalado.
I enjoyed the humor in this article! For more, click here: LEARN MORE. Let’s discuss!