Uncategorizedताज्या बातम्या

प्रतिकूल परिस्थितीतून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कै. अनिल रजपूत

श्रीपूर (बारामती झटका)

काही माणसं, कार्यकर्ते जीवन जगत असताना आपली वेगळी ओळख, नाव निर्माण करून आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. ही आठवण किंवा विस्ताराने लिहायचे म्हटले तर श्रीपूरमध्ये एक असे व्यक्तिमत्व घडले गेले की, त्यांनी अतिशय बिकट व प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या सामाजिक कार्यातून मोठे काम उभे केले ते नाव म्हणजे कै. अनिल रजपूत.

त्यांना आज आपल्यातून जाऊन जवळपास सोळा वर्ष झाली आहेत. त्यांची आज पुण्यतिथी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही ते खचले नाहीत. माणसं जोडण्याचा व अडचणीतील गरजूंना मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते उत्कृष्ठ क्रिकेट खेळायचे. सार्वजनिक गणेशउत्सव, शिवजयंती या सार्वजनिक कार्यात त्यांनी झोकून देऊन काम केले. हे करत असताना मोहिते पाटील घराण्याशी ते एकनिष्ठ, प्रामाणिक राहिले. विजयप्रताप मंचच्या माध्यमातून कार्यकर्ते, नेते यांचेबरोबर सामाजिक, विधायक, सांस्कृतिक काम करण्यात त्यांचा सहभाग मोठा राहिला आहे. त्यांनी परिस्थितीचे चटके सोसले होते, गरिबी काय असते हे अनुभवले होते.

माळशिरस तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सर्व जातीधर्माच्या गोरगरीब व बहुजन समाजातील मुलामुलींची लग्न मोठ्या थाटात करून सामुदायिक विवाह सोहळा त्यांनी आयोजित केला. एवढा अप्रतिम, देखणा, अविस्मरणीय विवाह सोहळा अतिशय शिस्तप्रिय व नेटका पार पाडला होता. त्या विवाह सोहळ्याला तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित होते. त्या विवाह सोहळ्याची चर्चा, कौतुक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाले आणि तेव्हापासून ते मोहिते पाटील परिवाराचे विश्वासू, जवळचे सहकारी मानले जाऊ लागले. आ. रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांचे निस्सीम कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख झाली.

अनिल रजपूत यांनी विजयप्रताप युवा मंच या संघटनेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील पुर्व भागात मोहिते पाटील समर्थक, कार्यकर्ते घडवण्यात मोठे योगदान दिले. अनेक जाती धर्माचे तरुण एकत्रित करून संघटन केले. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी श्रीपूर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक, लोक हितोपयोगी कार्यक्रम घेतले. अनिल रजपूत यांचा स्वभाव माणसं जोडणे, अडचणीतील गरजूंना मदतीला धावून जाणे, असा असल्याने त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडले, घडवले. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, सर्वरोग निदान शिबीर घेऊन सामाजिक कार्याची उंची वाढवली. अनेक हुशार, गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. ते उत्कृष्ठ क्रिकेटपटू असल्याने जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर खेळण्यासाठी जात असत. श्रीपूरमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धा त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या कार्याची गरुड भरारी सुरु असताना त्यांना अकस्मात दुर्धर आजाराने गाठले. त्यांचा अकाली मृत्यू सर्वांना चटका लावणारा ठरला.

अनिल रजपूत यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक काम करत असतानाच हॉटेल व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांनी चांगला जम बसवला. त्यांनी आपले भाऊ, कुटुंब एकत्रित ठेऊन आपली परिस्थिती सुधारली. त्यांनी या भागात अनेक कार्यकर्ते तयार केले. त्यांना सन्मान दिला, पद मिळवून दिले. त्यांच्यातील उमलता नेतृत्व असलेला कार्यकर्ता अकस्मात जाण्याने रजपूत परिवार यांचे तर खूप मोठे नुकसान झालेच परंतु श्रीपूर पंचक्रोशीतील लोकांचेही मोठे नुकसान झाले. सतत धडपडणारा, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा, एक सच्चा दिलदार, मनमिळाऊ स्वभावाचा तरुण तडफदार, उमदा कार्यकर्ता याचे अकस्मात जाणे, हे श्रीपूर पंचक्रोशीतील लोकांना जिव्हारी लागले आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे. अनेक आठवणी घटना प्रसंग लिहण्यासारख्या आहेत. परंतु काही मर्यादा पाळायला हव्यात. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort