प्रसाद सातपुते यांची यिन केंद्रीय उद्योजक समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड
सोलापूर (बारामती झटका)
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क यिनच्यावतीने यिन सेंट्रल कॅबिनेट उद्योजक समितीच्या उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील प्रसाद सातपुते यांची निवड झाली. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत, कार्य अहवाल या निकषावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात त्यांनी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवत ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर लेयर फार्मिंगचा व्यवसाय उभा करून ग्रामीण युवकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत असतानाच ते व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यिनचे व्यवस्थापक शामसुंदर माडीवर, यिन प्रमुख संदीप काळे यांनी सदर जबाबदारी दिली आहे.
आगामी काळात या समितीच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना उद्योजक बनवण्याचा निश्चय सातपुते यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng