Uncategorizedताज्या बातम्या
बहुजन क्रांतीच्या रॅलीला माढा तालुक्यातून १०० कार्यकर्ते जाणार – महेंद्र सोनवणे
टेंभूर्णी (बारामती झटका)
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी व सर्व संलग्न संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान वाचवण्यासाठी तसेच ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी यांसह अनेक मागण्या तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला असून त्याचा निषेध म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्त्वाखाली दि. ६ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये देशभरातून नागरीक सामील होणार आहेत. तसेच माढा तालुक्यातील १०० हून अधिक कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून पाठींबा देणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे माढा तालुकाध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
