Uncategorized

बहुजन पत्रकार संघ रोखठोक न्यूज यांच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

खुडूस (बारामती झटका)

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. २६/४/२०२३ रोजी सकाळी ११ वा. खुडूस निसर्ग पर्यटन केंद्र खुडूस, ता. माळशिरस येथे करण्यात आले होते. यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार विविध मान्यवरांना देण्यात आले.

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्युज यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वर्धापन सोहळ्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींना समाजरत्न, समाजभुषण, जीवनगौरव, आदर्श सरपंच पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब बोलताना म्हणाले, कोणताही माणूस कामामध्ये कितीही मग्न असला तरी त्याला वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. माळशिरस तालुक्यातील पत्रकारांनी सकारात्मक भूमिका मांडून समाजाचा, गावाचा, तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. चुकीच्या गोष्टीला चूक आहे असे म्हटलेच पाहिजे. या ठिकाणी ज्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात कार्य करत असताना समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून अनेकांना उभारी देण्याचे काम केले आहे, त्यांना पुरस्कार देऊन एक प्रकारे बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजने त्यांच्या कामाची उमेद वाढवली आहे. भविष्यकाळात माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करावे असे मत व्यक्त केले.

यावेळी बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्युज च्या वतीने चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्व सहकार्य केले जाईल. पत्रकारांनी देखील आपल्या लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे मत रोखठोक न्यूज चे संपादक मकरंद साठे यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब लावंड आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जि. प. प्रा. आदर्श केंद्र शाळा, नानासाहेब घार्गे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय जाधववाडी, रमजान शेख आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. प्रा. आदर्श केंद्र शाळा खुडूस, विष्णू पांडुरंग ठवरे आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. प्रा‌. आदर्श केंद्र शाळा खुडूस, तानाजी भिकाजी लोखंडे आदर्श शिक्षक पुरस्कार महालिंगेश्वर महाविद्यालय खुडूस, अविनाश भिमराव गायकवाड कनिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस, प्रवीणकुमार धोंडीबा स्वामी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार महालिंगेश्वर महाविद्यालय खुडूस, प्रशांत अण्णाजी रुपनवर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिव नगर, भीमराव सूळ समाजभूषण पुरस्कार कृषी अधिकारी कृषी विभाग पंचायत समिती माळशिरस, किसन वसंत खरात समाजभूषण पुरस्कार विस्तार अधिकारी पंचायत समिती माळशिरस, विठ्ठल भिकाजी कोळेकर समाजभूषण पुरस्कार विस्तार अधिकारी पंचायत समिती माळशिरस, अशोक तुकाराम डोके समाजभूषण पुरस्कार विस्तार अधिकारी पंचायत समिती माळशिरस, पांडुरंग शिखरे समाजभूषण पुरस्कार विस्ताराधिकारी कृषी विभाग पंचायत समिती माळशिरस, बळीराम मुंडे समाजभूषण पुरस्कार विस्ताराधिकारी कृषी विभाग पंचायत समिती माळशिरस, पांडुरंग सूर्यवंशी समाजभूषण पुरस्कार कनिष्ठ लिपिक पंचायत समिती माळशिरस, मंगला झुंजारराव खांडेकर जीवनगौरव पुरस्कार कर्मचारी पंचायत समिती माळशिरस, सुलभा पालके जीवनगौरव पुरस्कार पंचायत समिती माळशिरस, दीपक ईश्वरराव सुरनवर जीवनगौरव पुरस्कार रोहयो कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती माळशिरस, चंद्रशेखर लोखंडे जीवनगौरव पुरस्कार पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय माळशिरस, सुधाकर माने जीवनगौरव पुरस्कार, चंद्रकांत भोसले समाजभूषण पुरस्कार मंडलाधिकारी खुडूस, सोमनाथ माने समाजभूषण पुरस्कार तलाठी अधिकारी खुडूस, पल्लवी डांगे समाजभूषण पुरस्कार तलाठी पानीव, किशोर विठ्ठल भोसले जीवनगौरव पुरस्कार, रमेश गोफने आदर्श पोलीस पाटील पुरस्कार पानीव, मारुती कोळी आदर्श पोलीस पाटील पुरस्कार इस्लामपूर, भुजंगराव दत्तात्रय शिंगाडे आदर्श सरपंच पुरस्कार काळमवाडी (ता. माळशिरस), ज्ञानेश्वर शंकर कांबळे समाजरत्न पुरस्कार तरंगफळ (ता. माळशिरस), रजनीश दयानंद बनसोडे आदर्श सरपंच वेळापूर (ता. माळशिरस), नवनाथ बाळू भिसे निर्भीड पत्रकार पुरस्कार गोंदवले (ता. दहिवडी), श्रीनिवास कदम पाटील निर्भीड पत्रकार पुरस्कार मळोली (ता. माळशिरस), एकनाथ वाघमोडे निर्भिड पत्रकार पुरस्कार वावरहिरे (ता. दहिवडी), कैलास पवार निर्भिड पत्रकार पुरस्कार रेडा (ता. इंदापूर), हरिश्चंद्र साळुंखे समाजभूषण पुरस्कार वन परीमंडल माळशिरस (ता. माळशिरस), धनंजय खवळे समाज भूषण पुरस्कार पाणीव (ता. माळशिरस), सोमनाथ भोसले समाजरत्न पुरस्कार अकलूज (ता. माळशिरस), अर्जुन सरगर आदर्श सरपंच पुरस्कार झंजेवाडी (खु.) (ता. माळशिरस), एकनाथ वाघमोडे निर्भीड पत्रकार पुरस्कार वावरहिरे (ता. माण), साहिल अत्तार समाजभूषण पुरस्कार पिसेवाडी (ता. माळशिरस), सतीश कुलाळ समाजरत्न पुरस्कार खुडूस (ता. माळशिरस), किरण तुकाराम भांगे क्रांतिवीर पुरस्कार चाकोरे (ता. माळशिरस), दिपक कुमार बोडरे समाजरत्न पुरस्कार निमगाव म‌. (ता. माळशिरस), डॉ. सचिन शेंडगे जीवनगौरव पुरस्कार विझोरी (ता. माळशिरस), डॉ. चेतन शिंदे जीवनगौरव पुरस्कार खुडूस (ता. माळशिरस), दिलशाद मुल्ला जीवनगौरव पुरस्कार अकलूज (ता. माळशिरस), बाबासाहेब अडागळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मोरोची (ता. माळशिरस), रणजित ठवरे समाजभूषण पुरस्कार खुडूस (ता. माळशिरस), डॉ. केशव सरगर समाजभूषण पुरस्कार खुडूस (ता. माळशिरस), रायचंद खाडे समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वेळापूर (ता. माळशिरस), प्रा. डॉ. धनंजय साठे समाजभूषण पुरस्कार उघडेवाडी (ता. माळशिरस), सुनंदा तुकाराम डांगे आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. प्रा. प्राथमिक शाळा हनमंतगाव (ता. सांगोला), श्रीकृष्ण भिमराव ढोपे आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. प्राथमिक आदर्श केंद्र शाळा फोंडशिरस (ता. माळशिरस), पोपट बाबा बोराटे आदर्श सरपंच पुरस्कार ग्रामपंचायत फोंडशिरस (ता. माळशिरस), माणिक महादेव राऊत आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.प्राथमिक केंद्र शाळा मारकडवाडी (ता. माळशिरस) आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अल्प आहार वाटून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रानबा गोरवे सर यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button