भाजपचे नेते के. के. पाटील यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या सत्तेचे सिंहासन डळमळले…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडला…
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून एक हाती सत्ता असणाऱ्या सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या सत्तेचे सिंहासन डळमळले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. मोहिते पाटील परिवारातील लहान थोर मंडळी सकाळी उजाडल्यापासून रात्री उशिरापर्यंत माळशिरस तालुक्यात गावोगावी फिरताना दिसत आहेत.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीला श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पॅनल प्रमुख फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, मच्छिंद्र आबा ठवरे, सुरेशआबा पालवे, तुकारामभाऊ देशमुख, गौतमआबा माने पाटील, ॲड. सोमनाथ वाघमोडे, नामदेवनाना वाघमारे, विकासदादा धाईंजे, बाळासाहेब धाईंजे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, व्यापारी, हमाल तोलार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे नेते के. के. पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार कसा चालतो, याविषयी सखोल माहिती दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोल पंप स्वतःच्या मालकीचे तयार केले. मात्र, वजन काटे स्वतःच्या मालकीचे का केले नाहीत. यामधून मार्केट कमिटीची मानसिकता दाखवून दिलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांची नियुक्ती क्लार्क पदापासून सचिव पदापर्यंत कशा पद्धतीने बेकायदेशीर नेमणूक केलेली असल्याचे पुराव्यासहित दाखवून दिलेले आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी काय करणे आवश्यक होते, याचाही उलघडा करून मतदारांना फक्त मतदानापुरते वापर केला जातो. सर्वसाधारण सभेला व इतर कशालाही बोलावले जात नाही, याचे जाणीव करून दिली. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. अशा अनेक अभ्यासपूर्ण मुद्द्यांची मांडणी करून बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडलेला असल्याने सत्ताधारी मोहिते-पाटील गटाच्या सत्तेचे सिंहासन डळमळीत झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng