मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशनाचे आयोजन
कोल्हापूर (बारामती झटका)
मराठा सेवा संघ संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशनाचे आयोजन मराठा सेवा संघ व अन्य सर्व कक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जैन सांस्कृतिक भवन, कुरुंदवाड-नरसोबावाडी रोड, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
यावेळी या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी १०.३० ते ११.३० यावेळी सतराध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री इंजिनिअर विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवश्री संजयसिंह चव्हाण आय.ए.एस., मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी शिवश्री किशोर पवार कोल्हापूर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिवश्री नितीन देसाई, विक्रीकर सह आयुक्त व्यवसाय कर शिवश्री समरजीत आनंदराव थोरात, जिल्हा उपनिबंधक सहकार शिवश्री अमर शिंदे आदी असणार आहेत.
दुपारच्या सत्रात मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव इंजिनियर मधुकर मेहकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघाची संघटनात्मक बांधणी या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक औरंगाबाद येथील डॉ. बालाजी जाधव मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील हे असणार आहे.
या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात मराठा सेवा संघाच्या प्रदेश कार्यक्षम शिवमती नंदाताई शिंदे सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम – जिजाऊ ब्रिगेड या विषयावर शिवमती स्नेहा खेडेकर/धाडवे-पाटील, शिवमती प्राचार्य उज्वला साळुंखे, सोलापूर या मार्गदर्शन करणार आहे यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवमती लता ढेरे, आक्काताई माने, प्रिया नागणे, सुरजा बोबडे आदी असणारे आहेत.
या कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री प्रा. अर्जुन तनपुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली महामानवांचे विचार आणि मराठा सेवा संघ या विषयावर कला, वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील प्रा. डॉ शामसुंदर मिरजकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत महावितरणचे अधीक्षक अभियंता शिवश्री अंकुर कावळे हे असणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पाचव्या सत्रात समारोप होणार आहे. याच्या यावेळी अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर तर प्रमुख उपस्थितीत सारथीचे निबंधक शिवश्री अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिवमती मनीषा देसाई शिंदे, शिरोळच्या तहसीलदार शिवमती अपर्णा मोरे धुमाळ, सांगलीचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड, कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व प्रशासन शिवश्री निखिल जाधव हे असणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त मराठा बहुजन बंधू भगिनी व युवा वर्गाने सहभागी राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng