महिलांनी संकोच न बाळगता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे – सौ. ज्योतीताई पाटील.
अटल प्रतिष्ठानच्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उत्साहात अनावरण करण्यात आले.
मळोली (बारामती झटका)
महिलांनी समाजामध्ये वावरत असताना आत्मनिर्भर व निरोगी जीवन जगले पाहिजे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असताना मनामध्ये संकोच न बाळगता महिलांनी निरोगी व सुदृढ जीवन जगत आपले कुटुंब सुद्धा निरोगी राहण्यासाठी तत्पर असले पाहिजे, असा मौलिक सल्ला सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या व स्टॅंडिंग कमिटीच्या सदस्या सौ. ज्योतीताई केके पाटील यांनी मळोली, ता. माळशिरस, येथील काळे हॉस्पिटल येथे अटल प्रतिष्ठानच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीनचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर बोलताना सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांना पाच रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध होऊन निरोगी आरोग्यासाठी सर्वसामान्य महिलांना उपयोग व्हावा या उदात्त हेतूने अटल प्रतिष्ठान माळशिरस यांच्यावतीने मळोली येथे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीनचे अनावरण जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गावातील बचत गटाच्या व सर्व सामान्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या सौ. ज्योतीताई पाटील यांचा सन्मान बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई इंगोले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. सागर काळे, श्री. अमर मगर, श्री. मिनीनाथ मगर यांचाही सन्मान करण्यात आला.
सौ. ज्योतीताई पाटील यांनी उद्घाटन समारंभानंतर महिलांशी सुसंवाद साधून दिलखुलास गप्पा मारल्या. महिलांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे आभार भारतीय जनता पार्टी माळशिरसचे तालुका उपाध्यक्ष श्री. बलभीम जाधव यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For more information, I found this resource useful: FIND OUT MORE. What do others think about this?