Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात लगीनघाई…

मांडवे (बारामती झटका)

शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना उपक्रमशील व कृतीयुक्त शिक्षण देऊन त्यांच्यातील कलागुणांचा विकास करणे शिक्षणाचे मुख्य उद्देश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून त्यांना शालेय ज्ञानाबरोबरच सामाजिक जागरूकता निर्माण करता यावी यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे या ठिकाणी चेअरमन श्री. प्रमोदभैय्या दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

विवाहासंबंधीच्या कल्पना आणि विवाहाच्या पध्दती यामध्ये सुध्दा अनेक बदल झालेले आहेत. विद्यार्थ्यांना विवाह या संस्काराचा पूर्ण अनुभव येण्यासाठी बाहुला बाहुलीचे लग्न शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी लावण्यात आले. यामध्ये विवाहाचे सर्व विधी पार पाडण्यात आले. यासाठी वधू पक्ष विभाग व वर पक्ष विभाग असे दोन विभाग करण्यात आले होते. वऱ्हाडी मंडळी म्हणून मोठ्या प्रमाणावरती पालक वर्ग उपस्थित होता. सजलेला स्टेज, रुकवत, वाजणारी सनई व दुल्हन हम ले जायेंगे असा बोर्ड बनवून तयार केलेली गाडी, वेगवेगळ्या फुलांमधून सुंदर व आकर्षक काढलेली रांगोळी, वेगवेगळे आकर्षक चित्रं सर्वांचे आकर्षण ठरले.

सदर प्रसंगी रत्नत्रय शैक्षणिक संकुलामध्ये या लग्नाच्या दिवशी सर्वत्र लगीनघाई पाहायला मिळाली. सर्वजण माझ्याच कुटुंबातील विवाह असल्याचे आहे, असे समजून आनंदाने या उपक्रमात सहभागी झाले होते. लग्नामध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी लग्नाचा हा अविस्मरणीय क्षण पाहून या बाहुला बाहुलीच्या लग्नाला मानाचा आहेरही केला. सर्व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा अनोखा विवाह सोहळा पार पाडला.

सदर प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले, यासारखे वेगवेगळे विद्यार्थी केंद्रित उपक्रम शाळेमध्ये राबवावेत व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा. तर डॉ. श्री रणजीत गुरव साहेब यांनी या आगळ्यावेगळ्या राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच चेअरमन प्रमोदभैय्या दोशी म्हणाले की, आज शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहे. या बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांना यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले व सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी, श्री. डॉ. रणजित गुरव, श्री. विरकुमार दोशी, श्री. प्रमोद दोशी, वैभव शहा, बाहुबली दोशी, रामदास कर्णे, अर्जुन धाईजे, ज्ञानेश राऊत, दैवत वाघमोडे सर, सौ. विनयश्री दोशी, सौ. पूनम दोशी, सौ. धनश्री दोशी, सौ. सारिका राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधवी रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort