ताज्या बातम्याराजकारण

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची तयारी “शिवतिर्थ” बंगल्यावर, स्वारी मात्र “शिवरत्न” बंगल्यावर…

राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांचेकडून राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना गाजर दाखविण्यात आले आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांच्या माळशिरस येथील “शिवतीर्थ” बंगल्यावर पवार साहेबांच्या आगमनाची तयारी होती. मात्र, शरदचंद्रजी पवार साहेब यांची स्वारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या “शिवरत्न” बंगल्यावर गेली असल्याने देशमुख यांची तयारी वाया गेलेली आहे.

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या सांगोला येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभ हस्ते आणि माजी मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या कानामध्ये सांगितले. जयंतराव पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या जवळ जाऊन निरोप सांगितला.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे भाषण सुरू असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी शिवरत्नवर येण्याचा दुजोरा दिला. त्यानंतर शरदचंद्रजी पवार भाषणाला उठल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेऊन शिवरत्नवर पवार साहेब येणार असल्याचे सांगितले असणार. देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील भावभाव बदललेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर शरदचंद्रजी पवार यांनी वेळापूरवरून नातेपुते रस्त्याने न जाता अकलूज रस्त्याने जाऊन शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन एक तास चर्चा केलेली आहे.

शिवतीर्थ बंगला येथे देशमुख परिवार यांना बारामती येथे गोविंद बागेत लोक भेटण्यासाठी आलेले आहेत, असा निरोप दिला. खरंच जाण्याची घाई असती तर एक तास शिवरत्नवर घालवला नसता. मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर अडचणीच्या काळात शिवतीर्थ बंगल्यावर शरदचंद्रजी पवार यांचे आगमन झालेले होते. मात्र, राजकीय घडामोडी घडत असताना शिवरत्न बंगला येथे जाणे पसंत केले. त्यामुळे निष्ठावान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरदचंद्रजी पवार यांचेकडून गाजर दाखवण्यात आलेले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button