माढा मतदार संघात केंद्रीय मंत्री श्री. अजय कुमार मिश्रा यांचा दौरा
माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत दौऱ्याचे आयोजन
माढा (बारामती झटका)
केंद्रीय मंत्री श्री. अजय कुमार मिश्रा यांच्या माढा मतदार संघात माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत दौऱ्याचे आयोजन दि. २६ आणि २७ मे २०२३ रोजी करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि. २६ मे रोजी दु. ३ वा. कुर्डूवाडी येथील रेल्वे कार्यशाळेला भेट देण्यात येणार आहे. तसेच ३.४० वा. उपविभाग. ३.४५ वा. पंचायत समिती सभागृह, कुर्डूवाडी येथील सरकारी अधिकाऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यानंतर दु. ४.४० वा. पंचायत समिती सभागृह, कुर्डूवाडी व सौ. स्वातीताई गोरे घर, मळा रोड, इथे भेट देण्यात येणार आहे. ठिक ५ वा. विचार परिवार समनव्य सभा पार पडणार आहे. ५.२० वा पडसाळी, कुर्डुवाडी-शेटफळ रोड येथे केंद्र सरकारच्या कामाच्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायं. ६ वा. रेशन दुकानाला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर ७ वा. हॉटेल अतिथी, टेंभुर्णी, येथे लोकसभा कोअर – समितीची बैठक विधानसभा कोअर-समितीची बैठक होणार असून रात्रीचा मुक्काम देखील इथेच होणार आहे.
शनिवार दि. २७ मे रोजी ९.१५ वा. टेंभुर्णी येथील माढा जनऔषधी केंद्राला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर ९.३० वा. पुष्पक मंगल कार्यालय, टेंभुर्णी येथे लाभार्थी मेळा आणि बूथ आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ११.४० वा. भगवान सावता माळी मंदिर, अरण, दर्शन घेण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वा. अरण येथील यशोदा निवास येथे राष्ट्रीय खेळाडूशी भेट घेण्यात येणार आहे. १२.४५ वा. श्री. संजीव शिंदे, मोडनिंब, मधा यांच्याशी संवाद होवून त्यानंतर जेवण असणार आहे. त्यानंतर १.२५ वा. बालाजी वाघमारे यांच्याशी संवाद चर्चा होवून त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेनंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng