माळशिरसचे लोकप्रिय आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त चांदापुरी येथे मोफत आरोग्य तपासणी, रेशनकार्ड शिबीर संपन्न
चांदापुरी (बारामती झटका) रशीद शेख यांजकडून
चांदापुरी (ता. माळशिरस) येथे माळशिरस तालुक्याचे आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत सर्वरोग निदान शिबीर, रेशनकार्ड शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन चांदापुरी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन सौ. संस्क्रृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
जवळपास शंभर रुग्णांनी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करुन घेतली. तसेच शंभर ते दीडशे लाभार्थ्यांनी रेशनकार्ड शिबीराचा लाभ घेतला. सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबीराचे आयोजन चांदापुरी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आ. रामभाऊ सातपुते यांचे कट्टर समर्थक शाहिद शेख, प्रमोद मगर, नाथा सरक, नागराज मिसाळ, रमेश सुळ व पत्रकार रशिद शेख यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सरपंच जयवंत आण्णा सुळ, उपसरपंच तात्यासो चोरमले, जेष्ठनेते लिंगाआबा पाटील, पठाणवस्तीचे सरपंच एजाज पठाण, सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण, पार्टीप्रमुख विजयदादा पाटील, पुरवठा अधिकारी लोखंडे, केमकर प्राथमिक आरोग्य केंद्र माणकीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. भोसले, डॉ. शेख मॅडम, खताळ, मगर, साळवे मॅडम, धाईंजे, अक्षय जाधव, कांबळे, गुजरे, गोळे, लवटे, दणाणे सिस्टर, भोसले सिस्टर, लॅब टेक्निशियन सागर माने देशमुख, डॉ. शरद शिर्के, संतोष शेट्टी, थोरात, पुणेकर, तेजश्री माने आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
