माळशिरस तहसीलदार पदी सूरेश शेजूळ यांची नव्याने कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरसचे प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख यांची बदली फलटण प्रांत कार्यालय येथे झालेली असल्याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत कार्यरत असणारे अमरदीप वाकडे यांच्याकडे तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार सुपूर्द करण्यात आलेला होता माळशिरसचे तहसीलदार पदी सुरेश शेजूळ यांची नव्याने कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर रजेवर असल्याने निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार दि. 16 फेब्रुवारी 2023 पासून होता.

त्यांची बदली फलटण प्रांत कार्यालयात झालेली असल्याने त्यांच्याकडील तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार 26 मे 2023 रोजी अमरदीप वाकडे यांच्याकडे सुपूर्द केलेला होता. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्यातील परळी येथे कार्यरत असणारे सुरेश शेजूळ यांची पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नव्याने कायमस्वरूपी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच पदभार स्वीकारावा लागणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.