Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचा स्नेह मेळावा, सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 26/10/2022 रोजी अक्षता मंगल कार्यालय माळशिरस येथे होणार आहे.

पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब वाघमोडे पाटील, उपवनसंरक्षक मा.धनंजय मगर,आयएएस मा.सागर मिसाळ, आयपीएस मा.शुभम जाधव, आय आर टी एस मा.डॉ. रामदास भिसे, जिल्हा न्यायाधीश मा. उमेशचंद्र मोरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. महादेव घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार.

माळशिरस ( बारामती झटका)

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका माळशिरस यांच्या वतीने स्नेह मेळावा, सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 26/10/2022 रोजी सकाळी दहा वाजता अक्षता मंगल कार्यालय, 61 फाटा,माळशिरस-अकलूज रोड, माळशिरस येथे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.बाळासाहेब वाघमोडे पाटील, ओडिसा राज्यातील देवगडचे उपवनसंरक्षक मा.धनंजय मगर, आयएएस मा.सागर मिसाळ, आयपीएस मा. शुभम जाधव, आय आर टी एस डॉ.रामदास भिसे, जिल्हा न्यायाधीश मा. उमेशचंद्र मोरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. महादेव घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील नूतन अधिकारी व कर्मचारी तसेच उत्कृष्ट खेळाडू या शिलेदारांचा गुणगौरव व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.


क्रीडा विभागांमध्ये दैदीप्यमान कामगिरी करणारे कैरो येथे जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवलेले चि. रूद्राक्ष बाळासाहेब पाटील, भारतीय महिला क्रिकेटर आशिया चषक विजेती कुमारी किरण नवगिरे, आंतरराष्ट्रीय स्वीमर पॅरा ओलंपिक सुवर्णपदक विजेता सुयश जाधव, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती उत्कृष्ट मार्गदर्शक क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री. नारायण जाधव, महाराष्ट्र खो-खो संघाचे कॅप्टन रामजी कश्यप, महाराष्ट्र सांबू चॅम्पियन्स स्पर्धा 2022 मधील 68 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवणारे सचिन शहाजी वळकुंदे, नव्याने अधिकारी झालेले नायब तहसीलदार इंद्रजीत घुले, नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अजित ढोपे, सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वीरकुमार शिंदे, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत तरंगे, कर सहाय्यक विष्णू तरंगे, नूतन पोलीस अंमलदार सचिन पंढरीनाथ मोटे पिंपरी चिंचवड , यशवंत कदम पालघर, अक्षय मगर नागपूर शहर, सोमनाथ हुलगे मुंबई शहर, अविनाश लक्ष्मण काळे मुंबई शहर, बालाजी धस रायगड, तानाजी देशमुख पिंपरी चिंचवड, किरण मदने पिंपरी चिंचवड, अनिल लवटे पिंपरी चिंचवड, अमोल शिवाजी इंगोले ठाणे शहर, हेमंत रणनवरे मुंबई शहर, सारिका करे मुंबई शहर, गणेश तानाजी हुलगे मुंबई शहर, सत्यवान वाघमोडे मुंबई शहर, शेखर शेंडगे नवी मुंबई, पूजा बाबू तरंगे पिंपरी चिंचवड, दीपक तात्याबा गोरड मुंबई शहर, दीपक पोपट मदने मुंबई शहर, सागर सरगर उस्मानाबाद, इत्यादी यशस्वी व्यक्तीचा सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे. तरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व तालुक्यातील समस्त नागरिक यांनी सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आलेले आहे
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button